कागणी : सी. एल. वृत्तसेवा
सुरूते (ता. चंदगड) मल्लू ऊर्फ दादा रामा पाटील (वय ८१) यांचे रविवारी रात्री ११.४० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, जावई नातवंडे असा परिवार आहे. ते गावातील श्री ब्रह्मलिंग विकास सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन तर चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन तर दौलत साखर कारखान्याचे माजी संचालक होते. माजी आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील तर चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. सोमवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
No comments:
Post a Comment