आमदार राजेश पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदार संघातील चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा हे तालुके अत्यंत रमणीय व निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. याठिकाणी पारगड, कलानंदीगड, महिपाळगड, गंधर्वगड, सामानगड हे शिवकालीन किल्ले असून ही ठिकाणे तेथील निसर्ग संपदेमुळे भेट देण्याजोगी आहेत. तसेच आजरा, आंबोली, तिलारीनगर, आदी गिरिस्थाने प्रेक्षणिय आहेत. येथील धबधबे आणि मुसळधार पावसाच्या अनुभवासाठी खास पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन होत असते. येथे अनेक जुनी मंदिरे, जुळी जैन मंदिरे, अनेक गोष्टींची रेलचेल या भागात आहे. तरी या भागाचा पर्यटनात्मक दृष्ट्या विकास व्हावा यासाठी पर्यटन विकास कार्यक्रमातंर्गत निधी मिळावा अशी मागणी चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांनी पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांना केली आहे. नाम. तटकरे या कोल्हापूर दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन या कामांच्या संदर्भात चर्चा करून पाठपुरावा केला. या माध्यमातून भागातील पर्यटन स्थळांना निधीची तरतूद करावी व चंदगड विधानसभा मतदारसंघात येथे पर्यटन व्यवसाय वाढून येथे तरुणांना नविन उद्योग मिळावा अशी भूमिका पाटील यांनी मांडली. त्यावर लवकरात लवकर चंदगड विधानसभा मतदार संघासाठी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन अदिती तटकरे यांनी दिले.
चंदगड हे कर्नाटक व गोवा या दोन राज्यांच्या लगत असल्याने गोव्याला येणारे पर्यटक हे चंदगडला भेट देण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी या ठिकाणी परुटणाच्या दृष्टीने विकास होणे आवश्यक असून त्यासाठी या निधीची मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment