नयनसुख संतान धुपदाळे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अनिल धुपदाळे यांचे वडील नयनसुख संतान धुपदाळे (वय वर्षे ९२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, पनतवंडे असा परिवार आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते (सीमाप्रश्न चळवळीत भाई दाजीबा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग, सुरूवातीच्या काळात दिल्ली येथे मोरारजीभाई देसाई यांच्या ट्रान्सपोर्ट मध्ये सेवा, त्यानंतर कोल्हापूर येथे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यात सहभागी, मुंबई-गुजरात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात व उपोषणात सहभाग घेतला होता. दिनकरराव यादव, माजी आम. भाई माधवराव बागल, भाऊसाहेब महांगावकर, आप्पासाहेब महांगावकर, माजी मंत्री कै. एन. डी. पाटील, माजी आम. कै. नरसिंगराव भुजंगराव पाटील, माजी आम. कै. शंकर धोंडी पाटील, माजी आम. तुकाराम कोलेकर, कै. गुंडोपंत हारकारे, कै. तुकाराम पवार यांच्या सोबत कार्य केले. पुढे लोकल बोर्डाचे तत्कालीन प्रेसिडेंट दिनकरराव यादव यांनी जिल्हा परिषद मध्ये कै. नयनसुख यांना आरोग्य विभागमध्ये परिचारक म्हणून सेवेत घेतले.
माजी खास. कै. सदाशिवराव मंडलिक, केशवराव पवार, बाबूराव उत्तुरेकर यांच्या सोबत संपर्क वाढला. कै. धुपदाळे यांनी कोवाड, चंदगड, गगनबावडा व शेवटी हेरा आरोग्य केंद्रातून १९९३ साली सेवानिवृत्त झाले. नोकरी करत करत शेती, धार्मिक कार्यात सतत सहभाग होता. १९९० ते १९९५ साली माजीमंत्री भरमूआण्णांच्या निवडणूक प्रचारात मोठा मुलगा सुनील याला आण्णांच्या प्रचारार्थ भाग घेण्यासाठी सांगितले. आण्णांशी तेंव्हा पासून संपर्क आला. वेळोवेळी आण्णा स्वता घरी येऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत. कै. बाबासाहेब कुप्पेकर यांच्या राजकीय सुरवातीच्या जि. प. मधील कारकिर्दीत त्यांच्याशी संपर्क आला.
No comments:
Post a Comment