महागाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला खालिद व आफरीन स्वागत समारंभ, विविध मान्यवरांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

01 February 2022

महागाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला खालिद व आफरीन स्वागत समारंभ, विविध मान्यवरांची उपस्थिती

विवाह समारंभावेळी उपस्थित मान्यवर.

महागाव : सी एल वृत्तसेवा

             महागाव (ता. गडहिंग्लज) येथील शिवव्याख्याते, सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनाप्रणीत सहकारसेना गडहिंग्लज तालुका संघटक अखलाकभाई हुसेन मुजावर व सौ वहीदा अखलाक मुजावर यांचे चिरंजीव खालिद व हाजी मुसा महम्मदहनीफ दलवाई (रा. मायाक्का चिंचली) यांची सुकन्या आफरीन यांचा शुभविवाह नुकताच मायाक्का (चिंचली, ता. रायबाग, जि. बेळगाव) येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. 

            या विवाह प्रित्यर्थ महागाव येथील अनिकेत मंगल कार्यालयात संपन्न स्वागत समारंभास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. उपस्थित मान्यवरांत माजी रोहयोमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार सुरेशराव साळोखे, चंदगडचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संघटक संग्रामसिंह कुपेकर, आजरा साखर कारखाना चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे,केडीसीसीचे माजी उपाध्यक्ष विनायक उर्फ अप्पी पाटील, पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, प्रकाशभाई पताडे व अमर चव्हाण (संचालक गोड साखर), संभाजीराव पाटील (नगरसेवक आजरा), सुरेशराव कुराडे (राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सरचिटणीस), संजय जाधव (शिवसहकार सेना जिल्हाध्यक्ष), राजू सावंत व युवराज पवार (शिवसेना आजरा तालुका प्रमुख), सुजित चव्हाण व संभाजी भोकरे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख कोल्हापूर), सामाजिक कार्यकर्ते रियाजभाई शमनजी, संतोष चिकोडे (शिवसेना गडहिंग्लज शहर प्रमुख).

विवाह समारंभाला उपस्थित माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, उदयकुमार देशपांडे आदी. 

        अजित चव्हाण (कोल्हापूर), सुरेशदादा घाटगे (दादा डेव्हलपर्स बेळगाव), राजू रेडेकर (शिवसेना ग्राहक मंच चंदगड तालुकाप्रमुख), शिवाजीराव हीडदुगी, अजित काका देसाई,गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, चंदगड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सदस्य शहानुर मुल्ला, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष उदयकुमार देशपांडे, सहकारसेना मुंबई शहर प्रमुख चंद्रकांत नेवरेकर, सहकारसेना चंदगड तालुका अध्यक्ष सुरेश नाईक, कालकुंद्री तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष शंकर कोले, शिवसेना माजी विभागप्रमुख शंकर सांबरेकर, नारायण जोशी, भरत पाटील, निवृत्त पीएसआय पांडुरंग चव्हाण, शिवसेना माजी गडहिंग्लज शहर प्रमुख संजय संकपाळ, लेखक के. जे. पाटील, सामाजिक कार्यकर्ते एस. के. मुर्डेकर, तुकाराम बेनके, अर्जुन दिवटे, विवेक मनवाडकर, सतीश निर्मळकर, अरविंद कोकीतकर आदींसह महागाव ग्रामस्थ तसेच चंदगड, आजरा, गडहिंग्लज व कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध ठिकाणावरून मान्यवरांनी उपस्थिती लावून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले.

No comments:

Post a Comment