चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक समन्वय समितीने विविध प्रलंबित यांच्यासाठी दिनांक २२ व २४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपाचा निर्णय घेतलेला आहे. या संपात चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना शंभर टक्के सहभागी होत आहे. यासाठी दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी स.११वा. महात्मा फुले विद्यालय कार्वे या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चर्चा करण्यात येणार आहे. या सभेला संघटनेचे मार्गदर्शक माजी प्राचार्य ए. एस. पाटील, संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष रवी देसाई, संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी एस. डी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत .सभेसाठी चंदगड तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सभेला उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे. कोविड १९ नियमांचे पालन करून सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment