तेऊरवाडी येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सीए रितिशा हेंडोळे |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
आयुष्यात विद्यार्थी जीवन खूप महत्वाचे आहे. १० वी पासून पुढील पाच वर्षे प्रामाणिकपणे अपार कष्ट केल्यास पुढील ५० वर्षे आपले जीवन सुखी होईल असे विचार सीए निशिता शिवाजी हेंडोळे यानी व्यक्त केले.
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील माध्यमिक विद्यालयात सीए परिक्षा उत्तिर्ण झाल्याबद्दल निशिता हेंडोळे हिचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना रिशिता बोलत होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. बी. पाटील होते.
रिशिता पुढे बोलताना म्हणाली, आपण कोणत्या कुटंबात जन्मलो महत्वाचे नाही. आपले मन, मेंदू आणि मनगट घट्ट असेल तर परिस्थिती प्रतिकूल असताना देखिल उज्वल यश खेचून आणता येत. यासाठी विद्यार्थ्यानी या वयातच अपार कष्ठ करायला पाहिजेत. मोबाईलचा गरजेपुरता वापर करून पुस्तकांशी मैत्री केल्यास मस्तक नक्कीच सुधारेल आणी सुधारलेले मस्तक यश निश्चितच खेचून आणू शकते असा विश्वास रितिशाने विद्यार्थ्याना दिला.
यावेळी सीए परिक्षेत यश मिळवल्याबद्दल रितीशा व तीचे पालक शिवाजी हेंडोळे व सौ. सरिता हेंडोळे यांचा हायस्कूलच्या वतीने सत्कार मुख्याध्यापक एम .बी. पाटील यानी केला. या कार्यक्रमाला ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक एम. ए. पाटील यानी केले. सूत्रसंचालन प्रभाकर गावडे यानी केले तर आभार टी. एम. पवार यानी मानले.
No comments:
Post a Comment