गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीच्या लग्नाची चर्चा! मोरबी येथे डॉ. राजेश पाटील यांच्या कन्येचा विवाह सोहळा थाटात - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2022

गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीच्या लग्नाची चर्चा! मोरबी येथे डॉ. राजेश पाटील यांच्या कन्येचा विवाह सोहळा थाटात

नवदांपत्य.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

           अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ गुजरातचे विद्यमान अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ द्वारकाचे कोषाध्यक्ष, प्रतिथयश डॉक्टर, गुजरात राज्यात मराठी माणसांसाठी आधारस्तंभ व कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता ठरलेले डॉ. राजूभाई उर्फ राजेश कल्लाप्पा पाटील व सौ. रेखा राजेश पाटील (मुळगाव कालकुंद्री, ता चंदगड, जि. कोल्हापूर) यांची सुकन्या चि‌. सौ. कां. धारा  हिचा शुभविवाह बाळासाहेब नारायण कोकाटे (मुळगाव- चिचोंडीपाटील, जिल्हा अहमदनगर) सध्या राहणार वडोदरा / बडोदा गुजरात यांचे सुपुत्र चि. अजय यांच्याशी मोरबी- गुजरात येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.

           छत्रपती शिवजयंतीसह महाराष्ट्रीयन सण, उत्सव साजरे करून मराठी संस्कृतीचे गुजरातमध्ये जतन करण्यात डॉ राजेश व त्यांचे बंधू सुरेश, दीपक व विजय पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. धारा व अजय यांच्या लग्नाचे सर्व विधी महाराष्ट्रीयन संस्कृती प्रमाणे पार पाडून परंपरा जपली. लग्नसमारंभात उपस्थित सर्व पुरुष, महिलांना बांधलेले कोल्हापुरी भगवे फेटे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. मोरबी शहरात हा चर्चेचा विषय बनला होता.

         कोविडचे नियम पाळून महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून महनीय व्यक्तींनी या लग्न समारंभास उपस्थिती लावत वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. यात अखिल सौराष्ट्र महाराष्ट्र  मंडळ चे सल्लागार योगेश वाघ (गांधीधाम- कच्छ), देवेंद्र निगडे व राजूशेठ पाटील (मुंद्रा- कच्छ), दीपक बनसोडे, स्वप्नील मोरे, चंद्रकांत ढेरे, संजय प्रजापती, संजय बोरा (मोरबी),  सुनिल ऐतवडेकर (दत्तकृपा कन्स्ट्रक्शनचे मालक तथा अध्यक्ष- करवीर बिल्डर असोशियन कोल्हापूर), 

           अमरनाथ शेनेकर (जिल्हा अध्यक्ष माहिती अधिकार कोल्हापूर), संतोष म्हेतर (गोविंदा डेव्हलपर्स कोल्हापूर), स्वप्निल मोरे (मोरे अर्थमुवर्स कोल्हापूर), संदीप पाटोळे (हॅाटेल परख कोल्हापूर), राजेंद्र काटे (काटे डेरी फार्म कोल्हापूर), आर. बी. पाटोळे (चेअरमन गजानन नागरी पतसंस्था, कोल्हापूर), जसवंत बेंडकर, हरेशभाई चौहाण, शिवराम जाधव (भावनगर) पंकज तावडे, मानसिंग पवार, प्रशांत गोराड (अमरेली), प्रशांत सतीश, दिलीप चौहाण (थान), सुनील थोरवे (वेरावळ- सोमनाथ), श्रीकांत वै. पाटील (कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष- शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र), 

        मुंबई पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष- नंदकुमार ढेरे, सचिव- चेतन शेरेगार, सी एल न्यूज चॅनेलचे संपादक- संपत पाटील, सुरेश गजरा (ठाणे), राजेंद्र पाटील, भरत पाटील, संजय पाटील, नारायण गायकवाड, राजू पुजारी, पी. के. गायकवाड, आर. एम. पाटील (सर्व कालकुंद्री), याशिवाय अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ जुनागड, राजकोट, अमरेली, सुरेंद्रनगर, द्वारका, सोमनाथ, भावनगर, जामनगर, अहमदाबाद, सुरत, बडोदा आदी  जिल्हा शाखांचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. या लग्न सोहळ्यास मा. खासदार संभाजीराजे छत्रपती, कोल्हापूर, मा. भरमूअण्णा पाटील (माजी रोहयो मंत्री, महाराष्ट्र राज्य), सुभेदार मेजर गजानन चव्हाण (कांगो- दक्षिण आफ्रिका) यांच्याही शुभेच्छा लाभल्या.

No comments:

Post a Comment