आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून तीन गावांत विकास कामे - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2022

आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून तीन गावांत विकास कामे

कागणी (ता. चंदगड) येथे रस्ते कॉंक्रिटीकरण शुभारंभ करताना आमदार राजेश पाटील, सोबत जिप सदस्य अरुण सुतार, सरपंच सुप्रिया कांबळे आदी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         'चंदगड' चे आमदार राजेश पाटील व जि. प. सदस्य अरुण सुतार यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कागणी (ता. चंदगड) अंतर्गत येणाऱ्या कागणी, कल्याणपूर, हुंदळेवाडी या तीन गावात विकास कामांचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाला. 

         तिन्ही ठिकाणी गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण होणार असून यात कागणी १० लाख, कल्याणपूर ५ लाख, हुंदळेवाडी ५ लाख या कामांचा समावेश असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण होतील असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. स्वागत सरपंच सौ सुप्रिया कांबळे व उपसरपंच रामचंद्र देसाई यांनी केले. प्रस्ताविक रवींद्र देसाई यांनी केले यावेळी जिप. सदस्य अरुण सुतार, ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब खवरे, पोलीस पाटील अमृतराव देसाई, सुबराव पाटील, सुभाष बेळगावकर, वाय व्ही पाटील, विलास देसाई, गोविंद कांबळे, ग्रामपं चे सर्व सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गुंडोपंत देसाई यांनी केले. आभार अविनाश देसाई यांनी मानले.

No comments:

Post a Comment