कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्रीकृष्ण सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. सन २०२२ ते २०२७ साठी होणाऱ्या निवडणुकीत 'श्रीकृष्ण दूध संस्था विकास आघाडी' या सत्तारुढ पॅनेलला 'श्रीकृष्ण दूध संस्था परिवर्तन पॅनेलने आव्हान दिले आहे.
दोन्ही पॅनेलचे उमेदवार पुढील प्रमाणे- सत्तारूढ पॅनेल सर्वसाधारण गट- प्रकाश शिवाजी कोकितकर, श्यामराव तुकाराम जोशी, अनिल कृष्णा पाटील, अरविंद गोविंद पाटील, नरसु हनमंत पाटील, मनोहर हनमंत पाटील तर विरोधी पॅनेलमधून प्रकाश गणपती कोकितकर, अशोक रामू पाटील, मारुती परशराम पाटील, शांता तातोबा पाटील, सविता शिवाजी पाटील, भरत वाकोजी मुंगुरकर. महिला राखीव गट सत्तारूढ कडून वंदना प्रल्हाद पाटील व संपदा मारुती पाटील तर विरोधी पॅनेलमधून शोभा शिवाजी तेऊरवाडकर व अनिता संभाजी पाटील. अनुसूचित जाती/ जमाती गट सत्तारूढ कडून साताप्पा लक्ष्मण कांबळे तर विरोधी पॅनेलमधून पांडू सटूप्पा कांबळे आपले नशीब आजमावत आहेत. सत्तारूढ पॅनेलचे सलीम काशीम मोमीन व सिद्धाप्पा इराप्पा नाईक हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. पूर्वाश्रमीच्या नरसिंगराव पाटील गटात परस्परविरोधी विचारसरणीच्या दोन गटात चुरशीची निवडणूक होत आहे.
शनिवार दि. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार असून ३०७ मतदार आपला हक्क बजावून संचालक मंडळाची निवड करणार आहेत. केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री येथील केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
No comments:
Post a Comment