प्रशांत कुट्रे यांची 'मराठा सेवा संघ' जिल्हा उपाध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2022

प्रशांत कुट्रे यांची 'मराठा सेवा संघ' जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रशांत कुट्रे 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         गेली तीस वर्षे महाराष्ट्र राज्य, भारत देश व जगातील मराठा समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या 'मराठा सेवा संघ' या परिवर्तनवादी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी शिवश्री प्रशांत पांडूरंग कुट्रे केंचेवाडी (ता. चंदगड) यांची निवड करण्यात आली.            राजश्री शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत निवडीची घोषणा करण्यात आली. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष इंजिनीयर विजय घोगरे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे आदी मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र कुट्रे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. याप्रसंगी उद्योजक  कक्षाचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री राजेंद्र पाटील, विश्वशाहीर परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष शहाजी देसाई, अश्विन वागळे, महिपती बाबर, बाळासाहेब पाटील, मानसिंग देसाई, अलकाताई भोईटे, मनीषा देसाई, रणजीत आरडे, अशोक खाडे आदींसह मराठा सेवा संघ प्रणित विविध कक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment