जंगमहट्टी धनगरवाडयावर बेळगावच्या ऑपरेशन मदत या ग्रुपने शालेय साहित्य वाटप केले. |
चंदगड :. सी. एल. वृत्तसेवा
बेळगावच्या ऑपरेशन मदत या ग्रुपने ग्रामीण शिक्षण अभियान अतंर्गत जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील धनगरवाडयावर शालेय साहित्य वाटप केले.
या धनगरवाडयावर इ. पहिली ते पाचवीच्या वर्गात एकूण तेरा मुल शिकत आहेत. पुढील शिक्षणासाठी मुलांना पाच किलोमीटर चालत जावे लागते. यामध्ये शाळेला ग्रीन बोर्ड, खडू, डस्टर भेट दिला गेला. तर मुलांना वह्या, पेन , पेन्सिल, कंपास साहित्य, पुस्तके भेट देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला प्रा.जगदिश गस्ती, राहूल पाटील, प्रशांत बिर्जे, पद्मप्रसाद हूली, गौतम श्रॅप, स्वराज्य बिर्जे, संजय साबळे, आनंदा कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शेळके, विहान पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment