चंदगडचे ग्रामदैवत रवळनाथ यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ, रविवारी होणार सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2022

चंदगडचे ग्रामदैवत रवळनाथ यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ, रविवारी होणार सांगता

 
चंदगड येथील रवळनाथ यात्रेमध्ये पुजारी यांनी घेतलेली डोक्यावरील आरती.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
       चंदगडचे ग्रामदैवत व ८४ खेड्यांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री देव रवळनाथ यात्रेला सासनकाठी, आरती व पालखी मिरवणुकीसह आज मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. पुजारी विलास गुरव यांनी डोक्यावरील आरतीसह मंदिराला प्रदक्षिणा घातली. रविवारी (ता. २७) यात्रेची सांगता होणार आहे.
          दुपारी तीन वाजता पालखीसह मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यानंतर स्थानिक युवकांनी सासनकाठीने मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या. यावेळी भाविक पालखी व सासनकाठीवर गुळ, खोबरे, बत्ताशे, चिरमुरे व लाडू यांची उधळण करत होते. 
        चंदगड शहरासह हिंडगाव, फाटकवाडी, हंबेरे, मांगलेवाडी, देसाईवाडी येथील गावची आज यात्रा असल्याने या गावातील लोक यात्रेला आले होते. पालखी मिरवणूक मार्गात अडथळा येवू नये म्हणून स्वयंसेवक भक्तांनी मानवी कडे करुन भाविकांना सुचना देत होते. चंदगड तालुक्यातील रविवारी स्थानिक लोकांच्या यात्रेचा मुख्य दिवस असतो. त्यादिवशी यात्रेची सांगता होते.No comments:

Post a Comment