लाकुरवाडी येथे घरगुती भांडणात महिलेचा विनयभंग, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2022

लाकुरवाडी येथे घरगुती भांडणात महिलेचा विनयभंग, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       लाकुरवाडी (ता. चंदगड) येथे जुन्या घरगुती भांडणात महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार चंदगड पोलिसात दाखल करण्यात आली आहे. याबाबत  पुजा तानाजी निटट्टुरकर व प्रसाद तानाजी निट्टुरकर (दोघे रा. लाकुरवाडी) यांच्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी त्याची घरे समोरासमोर आहेत. त्यांच्यामध्ये गेल्या वीस वर्षापासुन जुना वाद असून त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे संभाषण नाही. दरम्यान आज दुपारी त्यांच्यामध्ये दारात घाण टाकण्यावरून वाद झाला. त्यात फिर्यादीला शिवीगाळ करून, थोबाडीत मारुन दुखापत केली. तसेच विनयभंग केल्याची तक्रार चंदगड पोलिसात करण्यात आली आहे. तसेच अन्य एका महिलेच्या डोक्यात मारुन दुखापत केली असून शिवीगाळ करत धमकी दिल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्हयाचा पुढील तपास पो. ना. भदरगे करीत आहेत.




No comments:

Post a Comment