भारत सरकारच्या मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान कोवाड केंद्रांतर्गत शिक्षक प्रशिक्षण संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2022

भारत सरकारच्या मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान कोवाड केंद्रांतर्गत शिक्षक प्रशिक्षण संपन्न

प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना कोवाड शाळेचे अध्यापक श्रीकांत आ. पाटील

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

    भारत सरकारच्या निपून भारत कार्यक्रमांतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत कोवाड केंद्रस्तरीय प्रशिक्षण नुकतेच विद्या मंदिर किणी येथे पार पडले.

      डाएट कोल्हापूर व शिक्षण विभाग पं. स. चंदगड यांच्या वतीने झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर होते. स्वागत केंद्र समन्वयक विलास पाटील यांनी केले. मार्गदर्शक संतोष सुर्यवंशी, श्रीकांत आप्पाजी पाटील, सागर खाडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अंगणवाडी ते इ. तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सन २०२७ पर्यंत मूलभूत वाचन, लेखन व अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करणे, याकामी पालकांमध्ये जाणीवजागृती होण्याच्या दृष्टीने त्यांच्या बैठकांचे आयोजन याबाबतचे मार्गदर्शन केले.

       यावेळी कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील, किणीचे मुख्याध्यापक आप्पाराव पाटील, बळवंत लोंढे, श्रीकांत सुबराव पाटील, पा. रा. पाटील, कविता पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी केंद्रातील कोवाड, निटूर, घुलेवाडी, मलतवाडी, कामेवाडी, दुंडगे, तेऊरवाडी, जक्कनहट्टी, चिंचेणे, किणी या शाळांतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. अनंत पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment