माणगाव येथील आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक पुतळा सुशोभिकरणाला ४ लाखांचा निधी - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2022

माणगाव येथील आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक पुतळा सुशोभिकरणाला ४ लाखांचा निधी

आमदार राजेश पाटील आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना.


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           माणगाव  (ता. चंदगड) येथील आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्या पुतळा सुशोभिकरण करण्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून ४ लाख १० हजार रुपयांचा निधी मिळाला. या कामाचा शुभारंभ  आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

          यावेळी संजय गांधी निराधार कमिटी सदस्य गुंडू यलाप्पा मेटकूपी, माजी पं. स. सदस्य  अनिल सुरुतकर, उपसभापती सौ. मनिषा शिवनगेकर, ग्रा. पं. सदस्या सौ. पार्वती चिंचणगी,  विठ्ठल पिटूक, पूतळा कमिटी अध्यक्ष मारुती मेटकर, लक्ष्मण ससेमारी, बडकू पिटूक, यलाप्पा पिटूक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment