गणुचीवाडी येथे शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2022

गणुचीवाडी येथे शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी

गणूचीवाडी येथे शिवजयंती साजरी करताना शिवभक्त.

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

          गणुचीवाडी (ता.  चंदगड) येथे भक्ती आणि शक्तीस्वरूप जल्लोषात शिवजयंती शासनाच्या आदेशाचे पालन करत विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

             यावेळी भजन करत दिंडितून ज्योत आणि मुर्ती मंडपात आणली. यावेळी सर्व महिलांनी मूर्तीचे पूजन केले. पूर्ण दिवस महिलांचे, विद्यार्थ्याचे सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच महिला भजनी मंडळ, निटूर यांचा हरिपाठ झाला. लाठी बाजी, तलवार बाजी, गदा याचे प्रात्यक्षिके गडहिंग्लजच्या मंडळाने दाखवले. तसेच शिवरायांच्यावर ऐतिहासिक चित्रपट दाखवून  शिवरायांचे या कार्याचे स्मरण करून देण्यात आले. शिवप्रतिष्ठान तरूण  मंडळाच्या व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. मंडळाचे संस्थापक विजय आर्दाळकर, अध्यक्ष कृष्णा पोटे, अंकुश अशीनकर, उपाध्यक्ष  आकाश आर्दाळकर, संजय परबकर, लहू उशिनकर सुजित देसाई, राजेश वाईंगडे, सुशांत आर्दाळकर, सुधीर ढोकरे, विक्रम आर्दाळकर, आदित्य आर्दाळकर, राजेश देसाई आदी शिवभक्त व ग्रामस्थ  उपस्थित होते.  
फोटो - गणूचीवाडी येथे शिवजयंती साजरी करताना शिवभक्त .

No comments:

Post a Comment