वसंत जोशिलकर यांचेकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करताना केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील सोबत मान्यवर. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्यावतीने मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे बांधण्यात येत असलेल्या विरंगुळा केंद्र व बहुउद्देशीय इमारतीच्या उभारणीस कोवाड केंद्रातून २ लाख २० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
वसंत जोशिलकर यांचेकडे मदतीचा धनादेश देताना जक्कनहट्टी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत सुबराव पाटील |
केंद्रातील शिक्षण परिषद प्रसंगी उपस्थित प्राथमिक शिक्षकांना संस्थेचे कार्याध्यक्ष वसंत जोशिलकर यांच्यासह पदाधिकारी शं. का. शिंदे, ल. पुं. बामणे, वाय आर निटूरकर आदींनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या उभारणीसाठी मदतीचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील, जक्कनहट्टी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत सुबराव पाटील यांनी धनादेशाद्वारे तर आप्पाराव पाटील, विलास पाटील अनंत पाटील, प्रभाकर राजगोळकर आदींनी प्रत्येकी पाच हजार रुपये रोख मदत केली. उर्वरित शिक्षकांची मदत एप्रिल महिना अखेर संस्थेकडे जमा करणार असल्याचे केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आले. स्वागत केंद्र प्रमुख सुधीर मुतकेकर यांनी केले. आभार बळवंत लोंढे यांनी मानले.
No comments:
Post a Comment