प्रा. शाहू गावडे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शाहू धानु गावडे यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. प्रा. गावडे हे नांदवडे तालुका चंदगड येथील असून ते माडखोलकर महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाचे अध्ययन करत आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे प्रोफेसर डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ``सोशाॅलॉजिकल स्टडी ऑफ वुमेन वर्कर्स इन कॅश्यु प्रोसेसिंग इंडस्ट्रीज वुईथ स्पेशल रेफरन्स टू कोल्हापूर डिस्टिक्ट`` या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला.
याकामी त्यांना संस्थेचे सर्व पदाधिकारी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, डॉ. एन. के. पाटील, डॉ. सतीश देसाई, डॉ. परशराम शहापूरकर, सुबराव भोगुलकर व काशिनाथ गावडे यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment