अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे व पृथ्वीराज खोराटे व भारतीय किसान संघ पदाधिकारी |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
भारतीय किसान संघ गडहिंग्लजचे राम पाटील व पदाधिकारी यांनी गडहिंग्लज कार्यक्षेत्रातील शिल्लक ऊसा संदर्भात शनिवार दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी कारखाना कार्यस्थळावर अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांची भेट घेतली. गोडसाखरच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप होई तोपर्यंत आपल्या कारखान्याची ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा कार्यरत ठेवावी अशी विनंती करण्यात आली.
भारतीय किसान संघाच्या कार्याची ओळख करून घेऊन, कार्यकर्त्यांच्या विनंतीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही माननीय मानसिंगराव खोराटे यांनी केली आहे. अथर्व इंटरट्रेड प्रा.लि. लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 चा गळीत हंगाम यशस्विरित्या प्रतिदिनी 4500 मे.टन पर्यत गाळप सुरु असून आजअखेर 4 लाख 85 हजार मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण झाले आहे. गाळप ऊसाची बिले वेळच्या वेळी व एफआरपी पेक्षा जास्त दर दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
एफआरपी वेळेत व जादा अदा होत असल्यामुळे राज्यस्तरावर कारखान्याची नोंद घेतली आहे. या वर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालला असून ऊसाचा उताराही चांगला आहे. पंधरा दिवसापूर्वीच्या झालेल्या घडामोडीकडे लक्ष वेधले असता श्री खोराटे म्हणाले की तो वाद संपुष्टात आला आहे, त्यावर किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या शब्दाला पुष्टी देताना सांगितले की, यशाच्या सन्मार्गावर अडथळे असायचेच अडथळ्यांचा मार्गच अंतिम यशापर्यंत पोहोचतो. झालेल्या प्रकारा बाबत भारतीय किसान संघाच्या वतीने कंपनीविषयी सहानुभूती व्यक्त करण्यात आली आहे. आपल्या कारखान्याच्या वाटचालीस पाठींबा व्यक्त करून आम्ही आपल्या सदैव पाठीशी ठामपणे उभा सर्वांनी सांगितले.
या भेटी प्रसंगी अथर्व कंपनीचे संचालक पृथ्वीराज खोराटे आणि कारखान्याचे सेक्रेटरी अनिल काटे यांचीही भेट झाली आहे. यावेळी भारतीय किसान संघ गडहिंग्लजचे अमरनाथ घुगरी, बसवराज हंजी, राम पाटील, राजु मोळगी, अशोक कमते, सुनिल कराळे, सर्वेश्वर छत्रेपाटील, गुरुराज हत्ती, संभाजी साळवी, विजय लाटकर, अरविंद कानडे, उमाशंकर मोहिते या कार्यकर्त्यांनी अथर्व दौलत परिवाराला शुभेच्छा दिल्या. यावेळी विक्रीकर अधिकारी श्री. गोपाळ पाटील, अॅड. मळवीकरही उपस्थित होते.
No comments:
Post a Comment