कोरज येथील प्राथमिक शाळेत विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2022

कोरज येथील प्राथमिक शाळेत विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

कोरज (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील विविध स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी. सोबत शिक्षक.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         मुलांच्या विवध गुणांना वाव देणेसाठी कोरज मराठी विद्यामंदिरयेथे क्रिडा, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, गायन, कथाकथन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामधे शाळेच्या 104 विद्दार्थ्यांनी भाग घेतला होता. ज्यामधे 70 विद्दार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमधुन आपले कौशल्य दाखवण्यात सरस ठरले.

         या सर्व विद्दार्थ्यांना शाळेच्या वतीने मेडल, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल व सर्टिफिकेट देवुन गौरवन्यात आले. ग्राम पंचायत सदस्य, स्कुल कमिटी सदस्य आणि ह्युमन राईट्सचे राट्रीय सदस्य बापूसाहेब शिरगांवकर यांनी स्पर्धेत जिंकनार्‍या 70 विद्दार्थ्यांसह स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थांना पेन देवुन त्यांचे कौतुक केले.

      या वेळी अनेक स्पर्धांमधे बाजी मारलेल्या ऐश्वर्या झांबरे, अणुष्का नेवगे, समृध्धी कुंदेकर, विक्रम गावडे व पृथ्वीराज नेवगे या पाच विद्यार्थांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सर्व कार्याला शाळेच्या मुख्याध्यापिका भोईटे मॅडम सह नाईक मॅडम, जोशी मॅडम, श्री. कांबळे व श्री. सावंत याचे मोलाचे सहकार्य लाभले.

             यावेळी स्कुल कमिटेचे अध्यक्ष परशराम पेडणेकर, सदस्य सागर मुळीक, शाहु कुबल, अनिता पाटील, ग्रा. प. सदस्य बापूसाहेब शिरगांवकर, पोलीस पाटील लक्ष्मण चौगुले, आशा सेविका कांबळे मॅडम सह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment