दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हलकर्णी या कारखान्याचा २०२१-२२ चा तिसरा गळीत हंगाम यशस्विरित्या सुरु आहे. कारखान्याने यावर्षी एफ. आर. पी निश्चित दरापेक्षा जादा दर देवून अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. येणाऱ्या ऊसासाठी प्रति मे.टन रु. २९०१/- प्रमाणे दर जाहिर करुन वेळेत अदा केलेला आहे. 01 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीत ५८४२२ मे. टन इतका ऊस कारखान्यास गळीतास आलेला आहे. या ऊसाचे बिल १६ कोटी ९४ लाख रुपये कारखान्याने बँकेत शेतकऱ्यांच्या खाती नुकतेच जमा केले असल्याची माहीती अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेडचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली.
चेअरमन मानसिंग खोराटे |
याबरोबर तोडणी वाहतुक बिलेही जमा केलेली आहेत. कारखान्याने १५ फेब्रुवारी २०२२ अखेर एकूण 460463 मे. टनाचे १३३ कोटी ५८ लाख रुपये इतके बिल आजअखेर शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा केलेले आहेत. याबरोबर तोडणी वाहतुक कंत्राटदाराचीही सर्व बिले अदा केली आहेत. यापूढेही सर्व बिले वेळेच्यावेळी अदा करणेत येतील असे चेअरमन श्री. खोराटे यांनी सांगितले.
यावर्षी कंपोष्ट खताची प्रत चांगली असून शेतकऱ्यांकडून कंपोष्ट खत खरेदीसाठी चांगल्या प्रकारे मागणी होवू लागली आहे. सध्या कारखान्याकडे विक्रीसाठी कंपोष्ट खत उपलब्ध आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये कारखान्याने कांही मशिनरीमध्ये तांत्रिक बदल केल्यामुळे कारखाना गाळप अखंड व अविरतपणे सुरु आहे. त्याचे श्रेय कारखान्याच्या सर्व घटकांना जाते. त्यामुळे आजअखेर ५ लाख १ हजार मे. टन इतके गाळप पुर्ण झाले आहे. कार्यक्षेत्रातील शिल्लक व राहिलेला ऊसाबाबत शेतकऱ्यांनी कारखाना शेती गट ऑफीसला माहिती देवून ऊस गाळपासाठी पाठवून देणेत यावा असेही आवाहन श्री. खोराटे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment