राजेंद्र कुट्रे |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका लाल बावटा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी कॉ. राजेंद्र शंकर कुट्रे यांची तर तालुका सचिव म्हणून कॉ. नंदकुमार तुकाराय नार्वेकर (रा. जेलुगडे) यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच तालुका उपाध्यक्ष म्हणून कॉ. श्रीमती पार्वती बाळा गावडे (रा. कोदाळी) यांची निवड करण्यात आली. नागनवाडी (ता. चंदगड) येथे धनंजय विद्यालयात शनिवारी याबाबतची बैठक झाली. या बैठकीमध्ये या एक मताने निवडी झाल्या. सर्व पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र कोल्हापूर लाल बावटा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष काॅ. भगवान पाटील यांनी दिले आहे.
No comments:
Post a Comment