विद्यार्थ्यांनी सुंदररित्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, जीवनपर नाटीकेद्वारा उलगडून दाखवताना |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सेंट स्टिफन्स स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी संचालक मंडळ सदस्या सौ. पुष्पाताई नेसरीकर उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते मूर्तिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा पाटील व मुख्याध्यापक अनंत गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. सुरेखा कुंभार यांनी केली. सूत्रसंचालन सौ. सविता गुरव व कु. वेदिका कोकरेकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी मनोगते तसेच नृत्य सादर केले. शिवस्तुतीपर गीतगायनही झाले. सौ. सुप्रिया नेवगे यांनी तडफदार मनोगत व्यक्त केले. रोहन चौगुले व सौ. अंकीता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदररित्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, जीवनपर नाटीकेद्वारा उलगडून दाखवला. तसेच नववीच्या विद्यार्थीनींनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे आभार सौ. जबीन पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment