नेसरी येथील एस. एस. हायस्कूल व छ. शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये छ. शिवाजी महाराज जयंती उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2022

नेसरी येथील एस. एस. हायस्कूल व छ. शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये छ. शिवाजी महाराज जयंती उत्साहात

नेसरी येथील एस. एस. हायस्कूल व छ. शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये  छ. शिवाजी महाराज जयंती साजरी करताना विद्यार्थ्यींनी व शिक्षक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एस. एस. हायस्कूल व छ. शिवाजी ज्युनिअर कॉलेज  छ. शिवाजी महाराज जयंती प्राचार्य ए. आर. मटकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवजयंतीनिमित्त दिपप्रज्वलन करताना उपस्थित शिक्षकवर्ग.

           प्रारंभी शिवप्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री. मटकर व उपप्राचार्य आय. टी. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी एस. जे. कालकुंद्रिकर स्नेहल नवलगी, प्रतीक्षा पाटील, स्नेहा पांडव, ईशा भिकले, समीक्षा सांबरेकर, साक्षी कांबळे, सई पाटील, साक्षी पाटील, ज्योती कडगावकर यांनी छ. शिवाजी महाराजांविषयी भाषणे केली. एस. ई. सुतार व गीतमंच यांनी छ. शिवरायांचा त्रिवार जयजयकर हे गीत सादर केले. सूत्रसंचालन शर्वरी गुरव हिने तर आभार शर्वरी नांदवडेकर हिने मानले. एस. ई. सुतार व गीतमंच यांनी छ. शिवरायांचा त्रिवार जयजयकर हे गीत सादर केले. उप प्राचार्य आय. टी. नाईक पर्यवेक्षक ए. डी. लोहार जेष्ठ शिक्षक एस. जे. बुगडे आदीसह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. आर. बी. भिल. यांनी कार्यक्रमाचे नियोजन  केले.

No comments:

Post a Comment