कालकुंद्री व कर्यात भागात शिवजयंतीचा उत्साह - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2022

कालकुंद्री व कर्यात भागात शिवजयंतीचा उत्साह

 सामानगड येथून शिवज्योत आणताना कालकुंद्री येथील मंडळाचे सदस्य.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

          महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती किणी कर्यात भागातील विविध गावांत अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली.

         कालकुंद्री येथे शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने ऐतिहासिक किल्ले सामानगड वरून सकाळी आठ वाजता शिवज्योत आणल्यानंतर शिवप्रतिमेची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर मध्यवर्ती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष शंकर कोले, माजी जिप. सदस्या सुजाता पाटील, एम जे पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व आजी-माजी सदस्य, विविध संस्था पदाधिकारी, माजी सैनिक यांचेसह नारायण जोशी, भरत पाटील, मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर, एन. जे. बाचुळकर, गजानन पाटील, अशोक पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीत सरस्वती विद्यालयाचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले.

           कालकुंद्री सह कर्यात भागात कुदनूर, राजगोळी, कोवाड, दुंडगे, कागणी अनेक गावात शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचे पथक राज किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली डुक्‍करवाडी ते यर्तेनहट्टी पर्यंत कार्यरत होते.

No comments:

Post a Comment