कडलगे खुर्द येथे श्री ब्रम्हलिंग मंदिर वास्तूशांती सोहळ्याचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2022

कडलगे खुर्द येथे श्री ब्रम्हलिंग मंदिर वास्तूशांती सोहळ्याचे आयोजन

  

श्री ब्रम्हलिंग देवालय कडलगे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

कडलगे खुर्द (ता.  चंदगड) येथील ग्रामदैवत श्री ब्रम्हलिंग मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा    शनिवार दि  19 फेब्रुवारी 2022 ते मंगळवार दि.  22 फेब्रुवारी 2022 पर्यंत संपन्न होत आहे.

      मौजे कडलगे खुर्द गावचे ग्रामदैवत श्री ब्रम्हलिंग मंदिराचे बांधकाम भाविक भक्त, दानशूर व्यक्ती, माहेरवासीन व ग्रामस्थ कडलगे खुर्द यांच्या अमृतमय सहकार्यातून 40 लाख रूपये खर्च करून संकल्प सिद्धी साकरली आहे. श्री ब्रम्हलिंग मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठान आणि कळसारोहण सोहळा प.पू.डॉक्टर  विश्वनाथ मारुती पाटील यांच्या अधिपत्याखाली आणि ब्रम्हलिंग देवालय पुनरुत्थान समितीच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. पुरोहित वेदशास्त्रसंपन्न    एम. जी. गुळवणी गुळवणी व सहकारी यांचच्या मंत्राने माघ कृ.  ३ शके १९४३ शनिवार दिनांक १९/०२/२०२२ ते माघ क्र.  ६ शके १९४३ मंगळवार दिनांक २२/०२/२०२२ अखेर संपन्न होत आहे.  यानिमित काकड आरती - पहाटे 4 ते 6, धार्मिक विधी - साकळी 7 ते 12, स्त्री भजन - दुपारी 1 ते 4, हरिपाठ - सायं.  4 ते 6, प्रवचन - सायं.  7 ते 8, नाश्ता, कीर्तन - रात्री 9 ते 11 व नंतर हरिजागर असणार आहे . रविवार दि २० रोजी कु. अश्वीनी सुर्यकांत पाटील यांचा भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम आहे. मंगळवारी महाप्रसाद आहे. सर्व  भक्तांनी उपस्थित राहून, श्रवण, सुखाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री ब्रम्हलिंग देवालय जिर्णोद्धार समिती कडलगे यांनी केला आहे.No comments:

Post a Comment