चंदगड तालुक्यात विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2022

चंदगड तालुक्यात विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी

 

ऐतिहासिक किल्ले पारगड येथून शिवज्योत आणण्यासाठी डुक्करवाडी (रामपूर)ता.चंदगड येथील महिला शिवभक्त ही सहभागी झाल्या होत्या. 

चंदगड / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय,  भवानी जय शिवाजी, च्या  जयघोषाचा आज भल्या पहाटेपासूनच  चंदगड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये गजर दुमदुमून गेला.  शिवजयंतीच्या औचित्याने तालुक्यातील पारगड, महिपाळगड, गंधर्वगड आणि कालानंदीगड या गडांवरून शिवज्योत नेण्यासाठी चंदगड तालुक्यातील तसेच बेळगाव  सीमाभागातील शिवभक्तांची शिवज्योत नेण्यासाठी गर्दी केली होती.       

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडांवर नियम व अटींचे पालन करत शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मिरवणुकीला फाटा देत विधायक कार्यावर भर देण्यात आला.  पारगडावर भवानीमातेच्या मंदिरातून शिवज्योत प्रज्वलीत करून देण्याची परंपरा आहे.  चंदगड तालुक्यातील  गावातील मंडळांनी तसेच बेळगाव सीमा भागातील शिवभक्तांनी शिवज्योत नेण्यासाठी गर्दी केली होती.  येणाऱ्या शिवप्रेमी मंडळाला मानाचा नारळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत होता. सकाळी शिवजन्म काल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. बी.  तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच गडांवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
  चंदगड शहरातील शिवभक्तानी विविध कार्यक्रम आयोजित केले होते.सांस्कृतिकृ ,आणि पोवाडे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


No comments:

Post a Comment