स्मिता शेटकर |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
विद्या मंदिर पिळणी (ता. चंदगड) शाळेत शिक्षण सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. स्मिता दिलीप शेटकर / स्मिता गणेश सावंत (मुळगाव सावंतवाडी) नुकत्याच नेट (मराठी) परीक्षा पास झाल्या. शिक्षण सेविका म्हणून असे यश मिळवणाऱ्या स्मिता या जिल्हयातील पहिल्या शिक्षिका ठरल्या आहेत.
परिश्रम, जिद्द, चिकाटी, वेळेचे योग्य नियोजन आणि अभ्यासातील सातत्य यांमुळे त्यांनी यशाला गवसणी घातली. त्या असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्र झाल्या आहेत. याकामी त्यांना गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, शिक्षण विस्तार अधिकारी, एम. टी. कांबळे, केंद्रप्रमुख जी. बी. जगताप आदींचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक एच.बी. पाटील, अध्यापक एल. टी. गावडे, पी.जी. सोनार यांचे सहकार्य लाभले.
सौ स्मिता शेटकर यांची प्रथम नेमणूक पिळणी शाळेतच झाली. विविध उपक्रम, शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शन यामुळे अल्पावधीतच त्या विद्यार्थी व पालक प्रिय ठरल्या आहेत. नेट मधील यशामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment