प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित कामांची तातडीने निर्गत करणार - गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2022

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित कामांची तातडीने निर्गत करणार - गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार

गटशिक्षणाधिकारी सुभेदार यांना निवेदन देताना शिक्षक संघाचे शिष्टमंडळ.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची विविध प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणार असल्याची ग्वाही चंदगडच्या गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चंदगडच्या शिष्टमंडळाला दिली. 

गटशिक्षणाधिकारी यांचे अभिनंदन करताना मान्यवर.
    

            प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नी पं. स. चंदगड येथे घेतलेल्या भेटी प्रसंगी त्या बोलत होत्या. वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झालेल्या  १७ शिक्षकांची वेतन निश्चिती करणे. सर्व शिक्षकांची १०० टक्के सेवा पुस्तके पडताळणीसह अद्यावत करणे. बीडीओ खात्यावर पगार जमा होताच पुढील कार्यवाही तातडीने करणे. वैद्यकीय व इतर प्रलंबित बिलांसंदर्भातील त्रुटींची संबंधित शिक्षकांकडून पूर्तता करून ३१ मार्चला बिले मिळण्यासाठी बजेट मागणी करणे (अजूनही कोणाला बिले सादर करायची असल्यास तात्काळ करावी) अपघात विमा योजनेची रक्कम पगारातून कपात होताच त्याची नोंद सेवा पुस्तकात तात्काळ करणे. यासह पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या शिक्षकांचे कार्योत्तर मंजुरीचे प्रस्ताव, निवड श्रेणी प्रस्ताव, कार्यालयाकडे सादर केलेली भविष्य निर्वाह निधी प्रकरणांची मंजुरी आदी विषयांवर चर्चा झाली, सर्व प्रलंबित व नियमित कामे जलद गतीने करण्याची हमी यावेळी सुभेदार यांनी दिली.

          याप्रसंगी शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेच्यावतीने सुभेदार यांचा केंद्रप्रमुख शामराव पाटील व माजी सभापती शांताराम पाटील यांच्या शुभ हस्ते  सत्कार करण्यात आला. शिष्टमंडळात शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश हुद्दार, शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी पाटील, कोषाध्यक्ष परशराम नाईक, भरमू तारीहाळकर, पदवीधर सभा तालुका अध्यक्ष अशोक नौकुडकर, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद पाटील, संघटक बाबुराव वरपे, के सी कांबळे आदी उपस्थित होते. सरचिटणीस दस्तगीर उस्ताद यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment