गंधर्वगडाची रविवारी यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2022

गंधर्वगडाची रविवारी यात्रा

देव चाळोबा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           ऐतिहासिक किल्ले गंधर्वगड (ता. चंदगड) येथील चाळोबा देवाची वार्षिक यात्रा रविवार दि .२७व २८फेब्रुवारी  रोजी होणार आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री दहा वाजता नाती विसरली रक्ताची हा सामाजिक नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवारी पहाटे पाच वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन आहे. सोमवार दि. २८ रोजी मुख्य यात्रेचा दिवस आहे. या दिवशी हाॅटेल व्यवसायिक मंडळ अलिबाग यांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.

No comments:

Post a Comment