माजी विद्यार्थी सरसावले शाळेच्या मदतीला, कशासाठी व कोणती शाळा....... - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2022

माजी विद्यार्थी सरसावले शाळेच्या मदतीला, कशासाठी व कोणती शाळा.......

शाळा रंगकामासाठी निधी देताना माजी विद्यार्थी युवराज शिंदे, वैभव डांगे, जोतिबा गोते.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        बालपणातील सर्वाधीक काळ ज्या शाळेमध्ये घालवला, शिक्षणाचे अन संस्काराचे धडे घेऊन जीवनात यशस्वी गरूडझेप घेतलेल्या श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) च्या सन १९९८-९९ सालच्या १० वी बॅचचे माजी विद्यार्थी सरसावले शाळेच्या मदतीला.

       ज्या शिवशक्ती हायस्कूलमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल केलेल्या माजी विद्यार्थ्यानी शाळेविषयी कृतज्ञता म्हणून काही ना काही देवू केले. यामध्ये प्रविण गुडवळेकर (बोंजूर्डी) यांनी शाळेच्या कंपाऊंडची व्यवस्था केली होती.  कोरोणा काळानंतर विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे  अध्ययन- अध्यापन  सुखकर व्हावे यासाठी तात्काळ  स्मार्ट टिव्ही व साऊंड सिस्टीमची व्यवस्था बोंजूर्डीच्याच प्रविणच्या बहिणी हिरा गुडवळेकर व उज्वला गुडवळेकर यानी करून शाळा डिजिटल करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. 

        याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी आज शाळेतील वर्गाच्या रंगरंगोटीसाठी तत्परता दाखवत पाच वर्गाच्या रंग कामासाठी आवश्यक तो निधी  उपलब्ध करून देवून सिंहाचा वाटा उचलला. याच १० वी बॅचच्या विद्यार्थ्यांनी वॅट्स अँप गृपच्या माध्यमातून जमा केलेला निधी युवराज शिंदे, वैभव डांगे, जोतिबा गोते या प्रतिनिधीनी आज श्री शिवशक्ती हायस्कूलचे अध्यापक बंकट हिशेबकर, एस. एन. पाडले, एस. के. पाटील, एस. डी. पाटील, आर. डी. पाटील, श्री. निर्मळकर यांचेकडे सुपुर्द केला. शाळा विकासासाठी लाखमोलाची मदत देणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment