अडकूर येथील आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2022

अडकूर येथील आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

अडकूर (ता. चंदगड) येथे आरोग्य शिबीर कार्यक्रमावेळी उपस्थित आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमुआण्णा पाटील,  कृष्ण-गंगा फौंडेशनचे अध्यक्ष आर. के. देसाई, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ व इतर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            अडकूर (ता. चंदगड) येथे इंडियन कॅन्सर सोसायटी भारत पेट्रोलियम व अन्को लाइफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरास पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराचे उद्घाटन आम. राजेश पाटील व माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांच्या हस्ते झाले. 

           प्रारंभी कृष्ण-गंगा फौंडेशनचे अध्यक्ष आर. के. देसाई यांनी स्वागत केले. आम. राजेश पाटील यांनी अडकूर पंचक्रोशीत आरोग्यदायी शिबिराचे आयोजन करून या भागातील रुग्णांची चांगली सोय केल्याचे सांगितले. तर अशा आरोग्य तपासणी शिबिरातून गोरगरीब जनतेची सेवा होत असते. त्यासाठी अडकूरचे सुपुत्र विनोदराव देसाई यांनी पुढाकार घेतला. ते महाराष्ट्र शासना मध्थे  मोठ्या पदावर असताना देखील त्यांनी गावाशी असलेली आपली नाळ तोडली नाही. तसेच अशा समाज कार्यातून त्यांनी येथील जनतेची अशीच सेवा करत राहावी अशी सदिच्छा माजी मंत्री भरमुआण्णा पाटील यांनी व्यक्त केली. 

          यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनीही मनोगत व्यक्त केले. विक्रीकर उपायुक्त विनोद देसाई व पंचायत समिती सदस्य बबनराव देसाई यांच्या पुढाकाराने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संभाजीराव देसाई - शिरोलीकर, गडहिंग्लज कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष उभय देसाई, सुरेश दळवी, बबन देसाई, आर. के. देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी सोमजाळ, आप्पासाहेब गिलबिले, रवि नाईक, श्रीकांत नाईक, श्रीकांत नेवगे, संदीप अर्दाळकर, संग्राम अडकूरकर, डॉ. मच्छीद्रनाथ पाटील, डॉ. अर्जुन शिंदे, डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. विनायक पाटील, डॉ. राधिका जोशी, डॉ. घळदे आदीसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप भेकणे यांनी केले. आभार अजित देसाई यांनी मानले.

No comments:

Post a Comment