मुलांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडण्याचे काम पालक व शिक्षकांचे - संजय साबळे - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2022

मुलांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडण्याचे काम पालक व शिक्षकांचे - संजय साबळे

धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील मराठी विद्यामंदिर येथे निपूण भारत अंतर्गत पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना
संजय साबळे

चंदगड :सी. एल. वृत्तसेवा

     "आजची शिक्षण पध्दती भरकटत चालली आहे. मूलं म्हणजे नोटा छापण्याचे मशिन म्हणून पाहिले जाते. आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनीयर व्हावे असा हट्हास असतो. मात्र मुलांना नेमके काय बनायचे आहे याचा विचार कोणताही पालक करत नाही. त्यामुळे मुलांच्या अंगातील सुप्त गुण दाबून टाकले जातात. अशा मुलांच्या मुलांच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडण्याचे काम पालक शिक्षकांचे आहे' असे प्रतिपादन प्रमुख वक्ते संजय साबळे यांनी केले.

          धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील मराठी विद्यामंदिर येथे निपूण भारत अंतर्गत पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून संजय साबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष श्रीपती पाटील होते.  प्रास्ताविक मुख्या द्यापक पी.टी. पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख गंगा गोकाककर यांनी करून दिली.यावेळी प्रत्येक वर्गातील आदर्श विघार्थी व विद्यार्थीनीचा शालेय भेटवस्तु देऊन माण्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

            सरपंच आर. जी. पाटील यांनी संस्कारातूनच मुलांचे व्यक्तीमत्व घडते हे अनेक उदाहरण देऊन पटवून दिले. कार्यक्रमाला प्रकाश पाटील, शालेय समिती सदस्य व मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरीता इंगळे यांनी केले. आभार जयवंत पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment