शिनोळी खुर्द येथील शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2022

शिनोळी खुर्द येथील शाळकरी विद्यार्थिनीची आत्महत्या

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          शिनोळी खुर्द  (ता. चंदगड)  येथील विद्यार्थिनी सलोणी नारायण पाटील (वय -१६) हिने पिकावरील कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले होते. मात्र सोमवारी सायंकाळी सात वाजता ती मयत झाली. याबाबत कृष्णा भावकू पाटील (रा. शिनोळी) यांनी चंदगड पोलिसात वर्दी दिली असून अधिक तपास सुरू आहे. 

         सलोनी हिने शिनोळी खुर्द येथील राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले होते. बेळगाव येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी असा परिवार आहे. ती हिंडलगा येथील हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती.No comments:

Post a Comment