'पल्स पोलिओ' मोहिमेचा चंदगड तालुक्यात उत्साह - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2022

'पल्स पोलिओ' मोहिमेचा चंदगड तालुक्यात उत्साह

कालकुंद्री येथे पोलिओ लस घेण्यासाठी उपस्थित बालके, सोबत पालक व वैद्यकीय पथक.

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

       देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा चंदगड तालुक्यात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते बालकास पोलिओ लस पाजून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. केंद्रांतर्गत गावांमध्ये ३० लसीकरण बुथ सुरू आहेत.     

लसीकरण प्रारंभ प्रसंगी पत्रकार श्रीकांत पाटील यांचे स्वागत करताना आरोग्य सेविका व पथक.

               सर्वेक्षणात आढळलेले लाभार्थी २६५७ इतके असून कोवाड बस स्टॅन्ड व किणी फाटा येथे दोन ट्रॅंजिट बूथ ठेवण्यात आले आहेत.  ८ फिरत्या पथकांमार्फत गेल्या दोन दिवसात ऊस तोड मजूर, फिरते कामगार, धनगर कुटुंबे आदी ठिकाणी लसीकरण केल्याची माहिती आरोग्य केंद्रातून सांगण्यात आली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहणार असून १००% बालकांना लस पाजून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

               कालकुंद्री येथे पत्रकार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते मोहिमेची सुरुवात करण्यात आली. स्वागत आरोग्य सेविका ए व्ही गावित यांनी केले, यावेळी आशा स्वयंसेविका अंजना सागर पाटील, माया तानाजी पाटील, सुमन सकट, लक्ष्मी मारुती हुंदरे यांच्यासह पालक व बालकांची उपस्थिती होती. आरोग्य उपकेंद्रात 'दोन थेंब पोलिओचे, आयुष्य वाढेल मोलाचे' या संदेशास अनुसरून सकाळी ८ पासूनच लसीकरणासाठी रीघ लागली होती. कालकुंद्री येथे १९८ लाभार्थी असून उद्दिष्टपूर्तीसाठी पथक प्रयत्नशील आहे.

No comments:

Post a Comment