पकडलेल्या दारुसह संशयित आरोपी व पोलिसांची टीम. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव ते वेगुर्ला मार्गावरील कोनेवाडी फाटा (ता. चंदगड) येथे गोवा बनावटीची दारु कर चुकवून घेवून जात असताना चंदगड पोलिसांनी पकडली. या प्रकरणी वैभव महादेव नाईक (वय-२६), प्रविण नाईक व अक्षय नाईक (सर्व रा. बोजुर्डी, ता. चंदगड) यांच्यावर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता हि घटना घडली.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी - शुक्रवारी गोवा बनावटीच्या दारुची वाहतुक होणार असल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्यानुसार त्यांनी बेळगाव-वेगुर्ला मार्गावर सापळा रचला. यामध्ये विना परवाना बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्याचा कर चुकवून गोवा बनावटीची दारु नेत असताना पकडण्यात आले.
पोलिसांनी पकडलेल्या मुद्देमाल पुढीलप्रमाणे............
१) 54,000/- रु. त्यामध्ये गोल्डन आयस ब्लु फाईन व्हीस्की कंपनाचे 10 बॉक्स एक बॉक्समध्ये 12 बॉटल एक बॉटल 750 मिलीची, एका बॉटलची किंमत 450 रु प्रमाणे.
२) 53,760/- रु. त्यामध्ये गोल्डन आयस ब्लु फाईन व्हीस्की कंपनाचे 10 बॉक्स एक बॉक्समध्ये 48 बॉटल, एक बॉटल 180 मिलीची, एका बॉटलची किंमत 112 रु प्रमाणे.
३) 18,000/- रु त्यामध्ये मॅकडॉल्स नंबर वन व्हीस्की कंपनाचे 2 बॉक्स एक बॉक्समध्ये 12 बॉटल, एक बॉटल 750 मिलीची, एका बॉटलची किंमत 750 रु प्रमाणे.
४) 54,000/- रु त्यामध्ये गोल्ड अॅन्ड ब्लॅक रम कंपनाचे 10 बॉक्स एक बॉक्समध्ये 12 बॉटल, एक बॉटल 750 मिलीची, एका बॉटलची किंमत 450 रु प्रमाणे.
५) 50,000/-रु त्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीची लाल रंगाची अल्टो गाडी क्र. MH04-BY-4053.
यामध्ये गाडीसह एकूण २ लाख २९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहा. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. ना. श्री. मकानदार तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment