चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील पारगड, कलानिधीगड, श्रीपादवाडी दत्तमंदिर, वैजनाथ मंदिर देवरवाडी, नरसिंह मंदिर निट्टूर, जैनमंदिर इब्राहीमपूर या ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळांची सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग चंदगड यांनी विकास आराखडा शासनाकडे सादर केला आहे. आमदार राजेश पाटील, ग्रामविकास मंत्री ना. मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी या कामी विशेष लक्ष घालून कामे मार्गी लावावीत अशी मागणी पर्यटक व संबंधित ग्रामस्थांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आलेली प्रस्तावित कामे पुढील प्रमाणे पारगड ९५० मी. रस्ता खडीकरण व डांबरीकरण(३२ लक्ष), १२० मी रस्ता खडीकरण व डांबरीकरण (५लक्ष), ६० मीटर रस्ता भरावसह खडीकरण व डांबरीकरण (२ लक्ष), १२ मीटर उंचीचा अडथळा व वळण काढून १५ मी लांब व रुंद रस्ता बनवणे (२लक्ष), स्वच्छतागृह बांधणे (१० लक्ष) एकूण ५२ लक्ष. दत्त मंदिर २ मी रुंद २२५ मी लांब रस्ता कॉंक्रिटीकरण (७.५० लक्ष), १५ मी लांब व ७.५ मी रुंद घाट बांधणे (५ लक्ष), एकूण १२.५ लक्ष. कलानिधीगड- ३.५ किमी रस्ता खडीकरण (१ कोटी), क्रॅश बॅरियर बांधणे (५० लक्ष). देवरवाडी- १६४ मीटर लांब फेसींग बांधणे, ६.५ मी × ४५ मीटर पीसीसी, पेविंग ब्लॉक आरसीसी पायऱ्या बांधणे एकूण १५ लक्ष. निट्टूर नरसिंह मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण आदी कामे एकूण ५७.५ लक्ष. इब्राहिमपूर जैन मंदिर १२०० मीटर रस्ता खडीकरण डांबरीकरण ४७.५ लक्ष, पीसीसी करणे, पाईप बसवणे २ लक्ष, एकूण ५० लक्ष. आदी कामे अंदाजित रकमेसह प्रस्तावित आहे.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारगड संबंधित कामे तत्काळ मार्गी लावावीत या मागणीसाठी किल्ले पारगड ग्रामस्थांनी आमदार राजेश पाटील यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन सादर केले. सर्व कामे लवकरच मार्गी लावू असे आश्वासन आमदार पाटील यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे समजते.
No comments:
Post a Comment