विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यानी मांडलेले प्रयोग पहाणी करताना परिक्षक |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुर (ता. चंदगड) येथे अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत रोबोटिक व प्रकल्प प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. डी. कुंभार होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच नामदेव कोकीतकर, सुजय पाटील (अटल झोनल अधिकारी), एम. के.आंबेवाडकर, देवदत्त काळगे (अटल इनचार्ज), ए. के. नागरदळेकर, बाळकृष्ण मुतगेकर, एस. आर. गुंडकल, नामदेव हेब्बाळकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी नीट परिक्षा उत्तीर्ण होऊन एमबीबीएसला पात्र ठरलेबद्दल मधुमंजिरी मुतगेकर हिचा प्राचार्य आर. डी. कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनात अल्ट्रासोनिक सेन्सर रडार सिस्टिम (प्राजक्ता नौकुडकर पुनम पवार), एलईडी ब्लब, अल्ट्रा सोनिक सेन्सर (सना मुल्ला, मधुरा गवेकर), उच्च दाब संरक्षण सर्किट (धनश्री अंबेवाड्कर, मधुरा बामणे), सॉईल मॉईलस्टोन सेन्सर (ऋतिका हंपन्नावर, श्रेया रेडेकर), अल्ट्रा सोनिक सेन्सर (साईनाथ मोटे, ज्ञानेश्वर पवार), जॉय स्टिक सेन्सर (आयाज मुल्ला, रेहान जमादार), रेन ड्रॉप सेन्सर वीथ मोटर (केशव ओऊळकर, विशाल कुट्रे), अल्ट्रासो निक सेन्सर फॉर सोशल डिस्टन्स (सारिका हेब्बाळकर, भूमिका वडर), अल्ट्रासोनिक सेन्सर (प्रतिक रेडेकर, आदित्य आंबेवाडकर, प्रणव कोकितकर) आदि विद्यार्थी -विद्यार्थीनिनी सेन्सर उपकरणे मांडली होती.
या विज्ञान प्रदर्शनातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरवही करण्यात आला. यावेळी बाककृष्ण मुतगेकर, मारूती आंबेवाडकर, सुजय पाटील यानी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक एन. एस. गावडे यांनी केले. सूत्रसंचालन बाळकृष्ण गणाचारी यांनी तर आभार नाना निर्मळकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment