चंदगड येथील दि न्यु इंग्लिश स्कुलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2022

चंदगड येथील दि न्यु इंग्लिश स्कुलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

चंदगड येथील दि न्यु इंग्लिश स्कुलमध्ये शिवजयंतीनिमित्त बोलताना एम. व्ही. कानुरकर, शेजारी  एन. डी. देवळे व इतर शिक्षक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेजमध्ये जेष्ठ अध्यापक एन. डी. देवळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती  कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

     कार्यक्रमाच्या सुरवातीला एन. डी. देवळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करून रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते म्हणजेच छ.शिवाजी महाराज होय. अशा शब्दांत एम. व्ही. कानूरकर यांनी शिवरायांची महती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक टी. एस. चांदेकर यांनी केले तर उपस्थितांची आभार टी. व्ही. खंदाळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment