स्वाती पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील बी. ए. भाग दोनमधील स्वाती लक्ष्मण पाटील (रा. तेऊरवाडी) हिची ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. ही निवड १७ फेब्रूवारी २०२२ रोजी सांगाव कागल येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेतून झाली आहे. त्यामुळे परिसरात तिचे कौतुक होत आहे. या बद्दल संस्था अध्यक्ष डॉ. ए. एस. जाभळे, सचिव एम. व्ही. पाटील, प्र. प्राचार्य व्ही. आर. पाटील आणि सर्व पधादिकारी यांनी अभिनंदन केले. तिला संचालक प्रा. आर. टी. पाटील व पांडुरंग मोहणगेकर यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.
No comments:
Post a Comment