दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) अथर्व इंटरट्रेड प्रा.लिमिटेड लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यावर्षी आलेल्या ऊसासाठी एकरकमी प्रति मे.टन रु.2901/- प्रमाणे दर दिलेला आहे. या कारखान्याचा 2021-22 चा तिसरा गळीत हंगाम संपला असून कारखान्याने यावर्षी नियमाप्रमाणे वेळेत किंबहुना वेळेच्या अगोदरही शेतकऱ्यांच्या आलेल्या ऊस बिलाच्या पूर्ण रक्कमा बँकामध्ये पाठविल्या आहेत.
अथर्व-दौलत कारखान्याने साखर कारखानदारीत वेळेत बील देणेची प्रथा पाडलेली असून सदरमूळे शेतकऱ्यांकडून कंपनी व्यवस्थापनास धन्यवाद मिळत आहेत. यामूळे सर्व स्तरातून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. ही बाब कारखान्याच्या दृष्टीने अभिनंदनीय आहे. 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत 43761.500 मे. टन इतका ऊस कारखान्यास गळीतास आलेला आहे. या ऊसाचे बिल 12 कोटी 69 लाख रुपये कारखान्याने बँकेत शेतकऱ्यांच्या खाती नुकतेच जमा केलेले आहेत. तसेच याबरोबर तोडणी वाहतुक बिलेही जमा केलेली आहेत.
कारखान्याने कारखाना हंगाम सुरुवातीपासून 28 फेब्रुवारी 2022 अखेर एकूण 504225.284 मे. टनाचे 146 कोटी 28 लाख रुपये इतके बिल आजअखेर वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा केलेले आहेत. अशी माहिती अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेडचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली.
No comments:
Post a Comment