दाटे सेवा संस्थेवर आमदार राजेश पाटील गटाची सत्ता, अध्यक्षपदी शिवाजी शिंदे तर उपाध्यक्षपदी पांडूरंग नाईक - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2022

दाटे सेवा संस्थेवर आमदार राजेश पाटील गटाची सत्ता, अध्यक्षपदी शिवाजी शिंदे तर उपाध्यक्षपदी पांडूरंग नाईक

दाटे सेवा संस्थेवर आमदार राजेश पाटील गटाची सत्ता आल्यानंतर हात उंचावून दाखविताना. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          दाटे (ता. चंदगड) येथील रवळनाथ विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी शिंदे व उपाध्यक्षपदी पांडुरंग नाईक यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूकही नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी के. आर. कोळी अध्यक्षस्थानी होते. 

शिवाजी शिंदे                    पांडूरंग नाईक
      संस्थेची निवडणूक अनेक वर्षांपासून बिनविरोध होते. यावेळीसुद्धा सभासदांनी ती परंपरा कायम राखली. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष शिंदे यांनी स्पष्ट केले. 

निवडणूक अधिकारी के. आर. कोळी
        या वेळी संचालक विठ्ठल पावले, विजय खरुजकर, सटुप्पा राऊत, अनंत कांबळे, महेश देशपांडे, तानाजी मोरे, गणेश रेडेकर, सटुप्पा गुरव, गजानन गावडे, माया खरुजकर, लक्ष्मीबाई तेरणीकर उपस्थित होत्या. सचिव सुनील देवण यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment