चंदगड पाणी पुरवठा विभागाच्या अभियंतापदी श्रीमती एस. एल. कांबळे रूजू - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2022

चंदगड पाणी पुरवठा विभागाच्या अभियंतापदी श्रीमती एस. एल. कांबळे रूजू

चंदगड येथील पं. स. मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागात उपअभियंता पदी रूजू झाल्यानंतर श्रीमती एस. एल. कांबळे यांचा सत्कार करताना मावळते अभियंता श्री. सावळगी, दोरूगडे, खोत, जगदाळे, पाटील आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड येथील पंचायत समितीतीकडील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता क्र. १ पदी श्रीमती एस. एल. कांबळे रूजू झाल्या. उपअभियंता ए. एस. सावळगी हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.

कोल्हापूर जि. प. मध्ये उपअभियंता श्रीमती एस. एल. कांबळे यांचा सत्कार करताना अध्यक्ष राहूल पाटील, बाजूला जयवंतराव शिंपी आदी.

          श्रीमती कांबळे यांचे मुळ गाव अहमदपूर जि. लातूर असून त्यांच्या नोकरीची सुरवात १९९४ पासून झाली. लातुर येथील किल्लारी भूकंपग्रस्त भागातून झाली. त्यानी ठाणे जिल्ह्यात मुरबाड, शहापूर या दुर्गम तालुक्यात शाखा अभियंता म्हणून अनेक वर्ष काम केले आहे.कोवीड १९ मध्थे कल्याण येथील कोविड सेंटर मध्थे रुग्णांना चांगली सेवा दिली. ठाणे जिल्ह्यातून पदोन्नतीने त्यांची कोल्हापूर जि.प.कडे बदली झाली आहे. जि. प. अध्यक्ष राहूल पाटील यानी कोल्हापूर येथे श्रीमती कांबळे यांचा तर चंदगड पं. स. मध्ये हजर झाल्यानंतर मावळते अभियंता एस. एस. सावळगी यांनी  श्रीमती कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शाखा अभियंता एस. डी. खोत, एस. एस. दोरूगडे, एस. आर. जगदाळे, पी. ए. पाटील, आर. के. जरळी, पी. एम.  कु-हाडे आदी कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

No comments:

Post a Comment