गोवा येथे महिला दिन साजरा करताना महिला वर्ग |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठा जागृती मंच , महिला मंच आणि मराठा सेवा संघ गोवा, राज्य शाखा महिला,जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुरगाव सडा किल्ला (गोवा) येथे विविध उपक्रमानी महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या फोटोचे पूजन व दिपप्रज्वलीत करून जिजाऊ वदंनेने मान्यवराच्या हस्ते कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी सौ.रंजना भरत पाटील, सौ. सरीता हर्डीकर, सौ. मनिषा रामचंद्र पाटील,सौ.निता कल्लाप्पा पाटील ,सौ.विजयालक्ष्मी नागराज वाबळे ,सौ.नदंनी बंळवंत पाटील,सौ .श्रेया बालाजी गायकवाड,सौ.श्रीमती ह,पवार, सौ.मागले ,सौ श्रीमती जाधव आदि महिला मान्यवर उपस्थित होत्या . यावेळी मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले . जशे मासाहेब जिजाऊनी आपल्या बाळ शिवबास माता, पिता, गुरू यारूपात कलाकौषल्यपारंगत घडवून क्रृर अन्याविरूध्द लढून स्वराज्य निर्मान केले अशा महान शक्तींचा आचार विचार आत्मसात करा.जगात होणारे महिलावरील अत्याचार नाहीसे झाले पाहीजे .शिक्षणामधून आपला ईतिहास नाहीसा होत चालला आहे , याकडे लोकप्रतिनिधीनी जातीने लक्ष घालन्याची गरज मान्यवरानी आपल्या भाषनातून स्पष्ट केले . यावेळी लहान मुलासाठी अनेक खेळ घेण्यात येऊन विजेत्याना बक्षिसे देऊन सन्मानित करन्यात आले .आपण सनातन काळापासुन आपल्या भुमातेला धर्तीमाता मानतो आणि जन्म देनारी माय माऊली तिच साऊली स्त्रीशक्तीचा आदर जागर समाजात मान सन्मान वाडावा व देशभक्ती वाडीस लागो यामुळे अ.भा.म.जागृती मंच,गोवा ,म.से.संघ.गोवा. रा.शा. संस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
No comments:
Post a Comment