नेसरी येथील पाटील विद्यालयात पारितोषिक वितरण व १० वीच्या विद्यार्थ्याना शुभेच्छा समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2022

नेसरी येथील पाटील विद्यालयात पारितोषिक वितरण व १० वीच्या विद्यार्थ्याना शुभेच्छा समारंभ

नेसरी येथील पाटील विद्यालयात १० वीच्या विद्यार्थ्याच्या शुभेच्छा समारंभावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             आयुष्यात आपल्या आई वडीलांचे कष्ट व संस्कार कधी विसरू नका असे मत मुख्याद्यापिका श्रीमती जयश्री पाटील व्यक्त केले. नेसरी येथील पाटील विद्यालयात आयोजित पारीतोषीक वितरण व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काशीबाई दळवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. आर. दळवी होते.

         मुख्याध्यापिका सौ. शमा कुरणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. कु. प्राची मुरकुटे, कु. प्रथमेश वांजोळे, कु. साईनाथ फगरे, कु. सुष्टी गुजांटी, कु. सानिका कोळी, कु. साक्षी नावलगी, कु. निकीता तुरटे यांनी मनोगत व्यक्त केले. धोडीबा पाटील,  नागोजी कांबळे, विश्वासराव रेडेकर, रामचंद्र परीट, सौ. जयश्री वळगडे, सौ. कुलकर्णी, अशीष दळवी, प्रकाश हेळवाडकर उपस्थित होते. सौ. जे. डी. कोळी यांनी सुत्रसंचालन केले. ए. एस. वांजोळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment