ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड कसे काढावे! सी. एल. न्यूज चॅनेलच्या वाचकांसाठी माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2022

ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड कसे काढावे! सी. एल. न्यूज चॅनेलच्या वाचकांसाठी माहिती देणारा स्पेशल रिपोर्टसी. एल. न्युजच्या वाचकांसाठी विशेष वृत्त

             सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हा महत्त्वाचा मालमत्ता दस्तऐवज आहे. आजवर तो शासकीय कार्यालयात जाऊन प्राप्त करून घ्यावा लागत असे. परंतु डिजिटल इंडिया आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नातून हा दस्तऐवज आपल्याला घर बसल्या आपल्या मोबाईल किंवा संगणकावर पाहता येणार आहे. त्याची शासकीय फी भरून 'डिजिटल साईन' प्रत देखील प्राप्त करून घेता येणार आहे. याचा वापर आपल्या विविध शासकीय, बँकिंग, न्यायालयीन आदी कामकाजासाठी करता येतो.

        प्रॉपर्टी कार्ड किंवा मालमत्ता पत्रक सात बारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावाने गावठाण किंवा शहरी क्षेत्रातील जमीन किती आहे. प्रकार, कोणता मालकी हक्क व फेरफार याबाबतच्या नोंदी व अनुषंगिक तपशील प्रॉपर्टी कार्डमध्ये नमूद असतो. महाराष्ट्र सरकारने आता हे प्रॉपर्टी कार्ड डिजिटल स्वाक्षरीत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

     आपल्याला मोबाईल किंवा संगणकावर https://bhulekh. mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर (वेबसाईट) जावं लागेल. या वेबसाईटवर उजव्या बाजूला Digitally Signed ७/१२ किंवा 'डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नवीन web पेज तुमच्यासमोर ओपन होईल. DOWNLOAD FACILITY DIGITALLY SIGNED 7/12, 8-AND PROPERTY CARD

            प्रॉपर्टी कार्ड किंवा मालमत्ता पत्रक काढण्यासाठी तुम्हाला या पेजवर लॉग-इन करायचं आहे किंवा आपला मोबाईल नंबर टाकून तुम्ही प्रॉपर्टी कार्ड पाहू शकता. त्याकरता OTP Based डेसळप ऑप्शन निवडून त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर Enter Mobile Numberच्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, OTP sent on your mobile असा मेसेज ओटीपी टाकल्यानंतर आपला सातबारा प्रॉपर्टी कार्ड स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे यापुढे आता प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या मोबाईलवर ते सोप्या येईल. पद्धतीने मिळवू शकता. आता आपण मिळवण्यासाठी किती फी आकारली जाते किंवा ती कशी मिळवावी याबाबतचा तपशील सविस्तरपणे पाहूया....

            तुमची मालमत्ता महानगरपालिका क्षेत्रात असेल तर डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला १३५ मिळकत. पत्रिका मोबाईलवर messanger निवडा. मध्ये OTP म्हणजेच One Time Password पाहून तो Enter OTPच्या खालच्या window मध्ये टाकावा. त्यानंतर Verify OTP या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर

           पुढे तुमच्यासमोर एक नवीन web पेज येईल. या पेजवर Digitally signed ७/१२, Digitally signed 8 अ, Digitally signed eFerfar, Digitally signed Property card, Recharge account, Payment वर क्लिक करा. History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील. यातल्या Digitally signed Property card या पर्यायावर सक्सेस तुम्हाला क्लिक करा. FOR

         आपल्याला 'डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड' नावाचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला महसुली विभाग निवडायचा आहे, त्यानंतर जिल्हा, भूमी अभिलेख कार्यालय आणि गाव एकदा गाव निवडलं की Property card fee for this village: Rs 45, असा मेसेज येईल. उताऱ्यासाठी ४५ रुपये इतकं शुल्क आकारणी आहे. या मेसेजखाली ओके क्लिक करा. आपला नगर भूमापन क्रमांक किंवा अंतिम भूखंड क्रमांक टाका. त्यानंतर disipay क्रमांक मधून आपला CTS क्रमांक

           आता आपल्याला रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. डिजिटल सहीच प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आधी ४५ रुपये आपल्याला खात्यात जमा करावे लागणार आहे.

            रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक केलं MAKE PAYMENT नावाचं एक नवीन पेज तुम्हाला दिसेल. इथं Enter amount समोर ४५ इतका आकडा टाकायचा आहे आणि मग पे नाऊ यावर ऑप्शन वर क्लिक करा.

             त्यानंतर रिफंड पॉलिसीसंदर्भातल्या पेजवरील उछत वर क्लिक करा. तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग किंवा भीम यूपीआय वापरून पैसे जमा करू शकता. एटीएम कार्डवरील तपशील माहिती टाकून पे नाऊ तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो इथे टाकून सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर पेमेंट झाल्याचा मेसेज स्क्रीनवर येईल. CONTINUE या ऑप्शन पर क्लिक करा.

            आता तुम्हाला विभाग, जिल्हा, भूमी अभिलेख कार्यालय, गाव आणि उदह नंबर निवडायचा आहे. ही माहिती भरून झाली की खाली ४५ रुपये जमा असल्याचं तुम्हाला दिसेल, मग डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड होईल. ही मिळकत पत्रिका डिजिटल स्वाक्षरीत असल्यामुळे त्यावर कोणत्याही कार्यालयीन सही अथवा शिक्याची आवश्यकता नसते. आणि शासनाच्या निर्दे शानुसार केवळ डिजिटल स्वाक्षरीत असणारेच प्रॉपर्टी कार्ड कायदेशीरदृष्ट्या वैध मानले जाणार आहे अर्थात हे प्रॉपर्टी कार्ड शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी वापरता येणार आहे.

- सिद्धेश्वर घुले, उपअधीक्षक भूमी अभिलेख गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर


No comments:

Post a Comment