कोवाड येथील केंद्र शाळा इमारतीचे रविवारी उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2022

कोवाड येथील केंद्र शाळा इमारतीचे रविवारी उद्घाटन

कोवाड येथील केंद्र शाळेची इमारत

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

          कोवाड  (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या ५८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन पाच खोल्यांच्या इमारतीचे उद्घाटन रविवार दि. २० रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.

       जि. प. अध्यक्ष राहुल पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,  शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिक्षण व अर्थ समिती सभापती सौ. रसिका पाटील, जिप. उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सौ. आशा उबाळे आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील शिक्षणप्रेमी नागरिक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा  जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण यांचेसह ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती कोवाड  यांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment