ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभावेळी उपस्थित विद्यार्थी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील मामासाहेब लाड विद्यालयात मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक, वाघमारे सटूप्पा टक्केकर ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक एन. जी. यळ्ळूरकर होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव येथील मराठा बँकेचे, मॅनेजर प्रकाश टक्केकर व संदीप चिंचणगी होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून माजी मुख्याध्यापक जी.जी. वाके होते. कार्यक्रमाला इयत्ता ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दहावीचा विद्यार्थी पारस पावले व नम्रता ओऊळकर आदी विद्यार्थ्यांनी शाळेतील गुणवत्तेचे कौतुक करून, आपण NMMS व स्कॉलरशिप परीक्षेत मिळविलेल्या यशाचा उल्लेख करून या शाळेत शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच सर्पमित्र झाल्याचे अभिमानाने सांगितले. कार्यक्रमाला व्ही. आर. पाटील मधुकर बोकडे, जे. डी. धामणेकर, प्रकाश टक्केकर (लिपिक इसापूर हायस्कूल) एस. जे. गावडे, सौ. बी. एम. गुरव, ए. आर. जाधव, सौ. ए. के. पाटील, तानाजी कांबळे, किशोर गोसावी आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. एस. जी. पाटील व प्रास्ताविक यु. एम. पाटील यांनी केले. आभार संदीप टक्केकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment