अथर्व - दौलत साखर कारखान्याच्या २०२१-२२ च्या गळीत हंगामाची या दिवशी होणार सांगता....... - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2022

अथर्व - दौलत साखर कारखान्याच्या २०२१-२२ च्या गळीत हंगामाची या दिवशी होणार सांगता.......

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि, हलकर्णी चा सन 2021-22 गाळप हंगाम समारोप गुरुवार 17 मार्च 2022 रोजी होणार आहे.           कारखान्याच्या शेती विभागामार्फत कार्यक्षेत्र नोंदीतील शिल्लक ऊस गाळपास उचल करणेचे प्रयत्न सुरु आहेत. नोंदीतील ज्यांचा ऊस शिल्लक आहे. तसेच रस्ता अडचण, कौंटूबिक अथवा वादग्रस्त कारणास्तव उभा ऊस शिल्लक आहे. त्यांनी शेती गट ऑफीसशी संपर्क साधून आपला ऊस खुदद तोडणी वाहतुक करुन गाळप हंगाम बंद होणेपूर्वी कारखान्यास गळीतास पाठवावा. गाळपाविना ऊस शिल्लक राहिलेस होणाऱ्या नुकसानीस कारखाना तसेच शासन जबाबदार राहणार नाही. याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. असे कारखाना प्रशासनामार्फत प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकातून कळविले आहे. 
No comments:

Post a Comment