रस्त्याच्या मोबदल्यासाठी उपोषणाला बसलेले शेतकरी. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड शहरालगतच्या बायपास रिंगरोड रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मागणीसाठी चंदगड उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या तीस-या दिवशी ठोस आश्वासन मिळाल्याने उपोषणाकर्त्यानी माघार घेतली.
चंदगड शहराच्या लगत गेल्या दहा वर्षा दरम्यान बायपास रिंगरोड रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादन केली आहे. पण दहा वर्षे होवूनही कोणालाही मोबदला मिळाला नाही. मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी सोमवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. बुधवारी तीस-या दिवशी बांधकाम विभागाच्या वतीने उपोषण कर्त्यांना प्रस्ताव सादर करावा. त्यावर शासनाच्या मंजूरी नंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे संध्याकाळी पत्रान्वये सांगण्यात आले. त्यानंतर उपोषण कर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. या उपोषणाला सतीश सबनीस, आषिश कुतिन्हो, सुरेश सातवणेकर, नियाज शेरखान, मुजीब शेरखान, शब्बीर सय्यद, सिध्देश्वर हरिज्वाळे, शिवाजी कुंभार, बाबू कुंभार, लक्ष्मण भेंडूलकर, अनंत मुळीक, इस्माईल शेख इत्यादीनी सहभाग घेतला होता. प्रकल्प ग्रस्तचे सर्वेसर्वा भाईसाहेब जंगमहट्टीकर यांनी या उपोषणाला पहिल्या दिवशी भेट देवून पाठींबा दिला होता.
No comments:
Post a Comment